मोदींचं कौतुक काँग्रेसच्या जिव्हारी; नाना म्हणाले, सर्टिफिकेट देणारे शिवसेनेचे राऊत कोण?

Nana Patole - Sanjay Raut

अमरावती : महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) माध्यमातून महाराष्ट्राच्या सत्तेत एकत्र असले तरी मागील काही दिवसांपासून काँग्रेस ठाकरे सरकारवर नाराजअसल्याचे वेळोवेळी दिसून येत आहे. त्यातही शिवसेना (Shiv Sena) विरुद्ध काँग्रेस (Congress) आणि विशेषतः राऊत विरुद्ध काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) असा वाद नेहमीच रंगताना दिसत आहे. असं असतानाच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊतांवर पुन्हा एकदा जोरदार फटकेबाजी केली आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदींचं कौतुक केले असले तरी मोदींना सर्टिफिकेट देणारे संजय राऊत कोण? असा प्रश्न उपस्थित करुन नाना पटोले यांनी पुन्हा काँग्रेसची असलेली नाराजी व्यक्त केली आहे.

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतल्यानंतर दोन ते तीन वेळा मोदींचं कौतुक केलं आहे. तसंच सामनामधूनही मोदींचं कौतुक केल्याचे बघायला मिळाले. पण हे कौतुक काँग्रेस आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मात्र जिव्हारी लागलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्टिफिकेट देणारे संजय राऊत कोण आहेत? असा प्रश्न पटोले यांनी उपस्थित केला. संजय राऊत यांना सर्टिफिकेट देण्याची जबाबदारी राज्याच्या नागरिकांनी दिली की देशाच्या, असे म्हणत पटोले यांनी राऊतांचा समाचार घेतला.

पंतप्रधानपद हे देशाचं सर्वोच्च पद आहे. पण नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाची गरिमा राखण्यात अपयशी ठरले आहे. देशातील अनेक कुटुंब रस्त्यावर आली आहेत, देशातील लाखो युवक बेरोजगार झाले आहेत. तीन कायदे लागू करुन शेतकऱ्यांना संपवण्याचा घाट केंद्राने घातला आहे. त्यामुळं मोदींना पदाच्या खाली खेचण्याचा आणि भाजपला मुळापासून नष्ठ करायचा निर्णय देशातील सुज्ञ नागरिकांनी घेतला आहे. म्हणून कोण काय सर्टिफिकेट देतं ते आमच्यासाठी महत्त्वाचं नाही. लोकशहीत जनता हीच मोठी असते, अशी अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.

भाजप (BJP) हा आमचा जन्मत: विरोधी पक्ष म्हणून राहिलेला आहे. पवार साहेब भाजपच्या विरोधात दुसरा पर्याय तयार करत असतील तर, ती आमच्यासाठी आणि देशाच्या हितासाठी चांगली बाब आहे. मात्र महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा काँग्रेस स्वबळावर लढवणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं. त्यामुळं काँग्रेसकडून पुन्हा एकदा स्वबळाची भाषा समोर आल्यानं खरंच महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल आहे का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button