‘हा’ प्रश्न शिवसेनेलाच विचारा : अशोक चव्हाण

Ashok Chavan-CM Uddhav Thackeray

मुंबई : केंद्र सरकार कृषी क्षेत्राशी संबंधित तीन विधेयके संसदेत मांडली. त्यापैकी दोन विधेयके संसदेच्या दोन्ही सभागृहांत मंजूर करण्यात आली आहेत. लोकसभेत कृषी विधेयकाला पाठिंबा देऊन राज्यसभेत शिवसेनेने (Shivsena) सभात्याग का केला, हा प्रश्न सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना केला.

यावर हा प्रश्न शिवसेनेलाच विचारा. महाराष्ट्रात आम्ही एकत्र आहोत. त्याच पद्धतीने केंद्रातही आम्ही एकत्र असायला हवे होते, अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी दिली .केंद्र सरकारने मांडलेल्या कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांची गळचेपी होणार आहे. या विधेयकामुळे मध्यस्थ दलालांचा फायदा होतो. याला काँग्रेस पक्षाचा विरोध आहे.

राज्यात आम्ही एकत्र आहोत, केंद्रातही एकत्र असायला हवे होते. शेतकरी हितासाठी काँग्रेस लढत आहे, तिथे सगळ्यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांचे हात मजबूत केले पाहिजेत, असे अशोक चव्हाण यांचे म्हणणे आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER