औरंगाबादच्या नामांतराला काँग्रेसचा विरोधच : अशोक चव्हाण

- थोरातांच्या फोटोला जोडे मारले

Ashok Chavan

जालना :- औरंगाबादचे नामांतर हा महाविकासआघाडी सरकारच्या (MVA Govt) ‘कॉमन मिनिमम प्रोगाम’चा भाग नाही. औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोध आहे. औरंगाबादचे नामांतर हा स्थानिक पातळीवरचा मुद्दा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) त्याविषयी काहीही बोलले नाहीत, असे अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पत्रपरिषदेत सांगितले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हा मुद्दा उचलल्यानंतर हा विषय चर्चेत आला आहे व लवकरच होणार असलेल्या औरंगाबाद मनपाच्या निवडणुकीमुळे त्यांना महत्त्व आले आहे. याआधी ओकांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनीही औरंगाबादच्या ‘संभाजीनगर’ नामांतराला काँग्रेसचा ठाम विरोध असल्याचे म्हटले होते.

थोरातांच्या फोटोला जोडे मारले

औरंगाबादचे (Aurangabad) नाव बदलून संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला विरोध केल्याबद्दल शनिवारी औरंगाबाद येथे मराठा ठोक क्रांती मोर्चाने थोरातांचा निषेध केला. त्यांच्या फोटोला जोडे मारले. या प्रकरणी पोलिसांनी निदर्शकांना ताब्यात घेतले आहे.

ही बातमी पण वाचा : औरंगाबादचे नामांतर पेटले, थोरातांच्या फोटोला मारले जोडे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER