मोदी सरकारच्या विरोधात आज राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसचं ऑनलाईन आंदोलन

congress-bjp

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत. त्यासोबतच देशातील राजकीय वातावरणसुद्धा तापू लागलं आहे. केंद्रात ‘मोदी सरकार २च्या एक वर्षपूर्तीच्या मुहुर्तावर ३० मे रोजी भाजप १००० व्हर्चुअल कॉन्फरंससह अनेक ई-रॅलींचे आयोजन करणार आहे. तर त्याआधीच काँग्रेसनं नरेंद्र मोदी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी रणनीती आखली आहे. मजूर, शेतकरी आणि छोट्या दुकानदारांसाठी पॅकेजची मागणी करत काँग्रेस आज ऑनलाईन आंदोलन करणार आहे.

ही बातमी पण वाचा:- राहुल गांधींचे एक विधान ठरले दुरावलेल्या महाविकास आघाडीतील सुसंवादाचा दुवा  

लॉकडाऊनमुळं मजूर, शेतकरी आणि गरीब जनतेचे मोठे हाल होत आहेत. या घटकांना मदत देण्याची मागणी करत कॉंग्रेस मोदी सरकारविरोधात ई आंदोलन करणार आहे. जे लोक इन्कम टॅक्सच्या परिघाच्या बाहेर आहेत अशा लोकांच्या खात्यात केंद्र सरकारकडून १० हजार रुपयांची मदत तात्काळ देण्यात यावी, या मागणीसाठी काँग्रेस आज ११ ते २ वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात ऑनलाईन अभियान राबवणार आहे. काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनी याबाबत माहिती दिली आहे आणि सर्व कार्यकर्त्यांना या आंदोलनात सहभागी होण्याच्या सूचना दिल्या आहेत.

काँग्रेस पक्षाच्या या आंदोलनात फेसबुक, ट्विटर, यू ट्यूब, इंस्टाग्राम अशा सोशल मीडिया प्लॅटफार्मवर एकत्रित ५० लाख कॉंग्रेस कार्यकर्ते ऑनलाईन आपली बाजू मांडणार आहेत, अशी माहिती आहे. ऑनलाईन अभियानाच्या माध्यमातून मजूर, शेतकरी आणि छोट्या दुकानदारांसाठी काँग्रेसकडून मुद्दे मांडले जाणार आहेत. आपली मागणी घेऊन कॉंग्रेस मोठ्या प्रमाणात ट्रेंड करण्याचा प्रयत्न करणार आहे. काँग्रेसनं म्हटलं आहे की, आम्ही संकटात सापडलेल्या लोकांसाठी मागणी करत आहोत. त्यासाठी हे आंदोलन आहे. केंद्र सरकारनं या संकटात सापडलेल्या लोकांना मदत करावी आणि कॉंग्रेसनं केलेल्या मागण्या पूर्ण कराव्यात. जे लोक इन्कम टॅक्सच्या परिघाच्या बाहेर आहेत अशा लोकांच्या खात्यात केंद्र सरकारकडून १० हजार रुपयांची मदत तात्काळ देण्यात यावी, असं कॉंग्रेसनं आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER