…लोक ऑफिसला कसे जाणार? मुंबईतील निर्बंधांवरून काँग्रेसचा ठाकरे सरकारला सवाल

Nirupam-Uddhav

मुंबई :- राज्यात कोरोनाच्या (Congress) दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसात रुग्णसंख्येत घट झाल्यानंतर राज्य सरकारने कोरोनाचे निर्बंध सैल करणे सुरू केले. कार्यालये सुरू केली पण त्या प्रमाणात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था खुली केली नाही. काँग्रेसचे नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी याबाबत राज्य सरकारवर टीका केली – प्रश्न विचारला, लोक ऑफिसला कसे जाणार?

संजय निरुमप यांनी ट्वीट केले – मुंबईमध्ये लॉकडाउनचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. पण, यामुळे लोकांना त्रासच जास्त होणार आहे. कार्यालये उघडली जात आहेत, पण सार्वजनिक वाहतूकच नाही. एकतर बसेसची संख्या वाढविण्यात यावी किंवा नियंत्रित प्रमाणात लोकल सुरू करण्यात यावी. नाहीतर लोक ऑफिसला कसे जाणार? वर्क फ्रॉम ऑफिसलाही एक मर्यादा आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button