कंगना रणौत हिची काही तक्रार असेल तर तिनं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घ्यावी – कॉंग्रेस

CM Uddhav Thackeray-Kangana Ranaut.jpg

मुंबई : कंगना रणौत (Kangana Ranaut) हिची काही तक्रार असेल तर तिनं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)  यांची भेट घ्यावी. पण विनाकारण कोणाच्या हातामधील हत्यार होऊ नये, असं म्हणत कॉंग्रेस नेते आणि मुंबईचे पालकमंत्री असलम शेख (Aslam Sheikh) यांनीही कंगनाच्या प्रकरणावरून तोंडसुख घेतल्याचे दिसत आहे. कंगनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोण वार करतेय हे सगळ्यांना ठाऊक आहे.

कंगनाला हाताशी घेऊन कोण आपली राजकीय पोळी भाजून घेत आहे, हे संगळ्यानाच माहीत आहे. कंगनाला राजकारणात यायचं नाही, हेदेखील तिनं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे कुठलेही वक्तव्य करण्यापूर्वी तिने विचार करावा, असा सल्लादेखील पालकमंत्री असलम शेख यांनी कंगनाला दिला आहे. दरम्यान, खासदार, अभिनेत्री जया बच्चन यांनी कंगनाचे नाव न घेता संसदेत तिला खडे बोल सुनावले होते. त्यानंतर ऊर्मिला मातोंडकर यांनीही कंगनाला सुनावले. कंगनाने फिल्म इंडस्ट्रीला गटार म्हटल्यानंतर मुंबईतील कलाकार कंगनावर तुटून पडले आहेत.

दरम्यान, ‘सिनेसृष्टीचे ‘गटार’ झाले’ असे बोलणाऱ्यांनी लाज सोडली. पण त्याच्यामागे सत्ताधाऱ्यांच्या ‘झांजा’ असल्याने या मंडळींनाही चिपळ्या वाजवाव्या लागतात. मग सिनेसृष्टीशी ती बेइमानी ठरली तरी चालेल. ‘सब घोडे बारा टके’ असे सरसकट म्हणणे हा सच्च्या कलाकारांचा अपमान ठरतो. जया बच्चन यांनी तोच आवाज उठवून सिनेसृष्टीला जाग आणली,  असं म्हणत शिवसेनेनं जया बच्चन यांची पाठराखण करत कंगना रणौतवर पुन्हा एकदा पलटवार केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER