काँग्रेस-राष्ट्रवादीला प्रकाश आंबेडकर यांच्या निर्णयाची वाट : अशोक चव्हाण

Prakash-Chavan

औरंगाबाद :- प्रकाश आंबेडकर यांच्या निरोपाची वाट पाहात आहोत. त्यांचा निरोप येत नसल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी उमेदवार जाहीर करावयाचे थांबले आहे, अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिली. राजीव गांधी स्टेडियमवर गुरुवारी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी चव्हाण यांनी भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले . चव्हाण म्हणाले , ‘वंचित बहुजन आघाडीला माझी हात जोडून विनंती आहे की, भाजपला मदत होईल, असे काही करू नका. केवळ ३० टक्के मतांवर भाजपचे सरकार आलेले आहे. उर्वरित ७० टक्के मते एकमत राहिली पाहिजे यासाठी प्रयत्न करा . मतांचे विभाजन टाळावे यासाठीच मी स्वत: प्रकाश आंबेडकर यांच्या घरी जाऊन चर्चा केली . जागावाटपाचा मुद्दा मोठा नसून प्रकाश आंबेडकर हे खासदार बनावेत, ही आमची इच्छा आहे .त्या दृष्टीने मतांचे विभाजन टाळून भाजप -शिवसेनेला पाडण्याच्या तयारीस लागा, असे आवाहन चव्हाण यांनी केले.

ही बातमी पण वाचा : प्रकाश आंबेडकरांनी सत्ता कशी मिळवावी हे माझ्याकडून शिकावं- आठवले

विधानसभेचे अधिवेशन २८ फेब्रुवारीला संपेल . हे अधिवेशन संपताच मुख्यमंत्री विधानसभा बरखास्त करतील आणि लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुकादेखील घेतल्या जातील. काँग्रेसचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विरोध आहे . त्यामुळे आमची भूमिका बदलणार नाही , असेही ते म्हणाले .

ही बातमी पण वाचा : प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात दलित, पीडित, वंचित एकवटत आहेत : आनंदराज आंबेडकर

ही बातमी पण वाचा : प्रकाश आंबेडकर विरोधात बोलले तरीही त्यांना सोबत घेऊच – जयंत पाटील