मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदलीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचा शिवसेनेवर दबाव?

Congress & Shivsena & NCP - Maharastra Today

मुंबई :- भक्कम पुरावे असतील तर मुंबई पोलीस आयुक्त (Mumbai Police Commissioner) किंवा संबंधित अधिकाऱ्यांच्या तत्काळ बदल्या करा, यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेवर दबाब टाकत आहेत, असे संकेत मिळत आहेत.

सचिन वाझे (Sachin Vaze) यांना अटक झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये पोलीस विभागामध्ये (Maharashtra Police) मोठ्या प्रमाणात आदलाबदल होतील अशी चर्चा सुरू आहे. यासाठी काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आग्रही आहेत. सरकारची बदनामी थांबवण्यासाठी, ज्यांच्या विरद्ध भक्कम पुरावे आहेत त्या पोलीस अधिकाऱ्यांना तत्काळ हलवा, अशी भूमिका दोन्ही पक्षांनी घेतल्याची माहिती आहे.

सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर एनआयए आता मनसुख हिरेन मृत्युप्रकरणाचा तपास करणार आहे. यापुढे या प्रकरणांमध्ये मुंबईतील काही मोठे अधिकारी तसेच राजकीय नेते अडकण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी मुंबई पोलीस आयुक्त आणि गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यामुळे राज्य सरकारची कोंडी होते आहे. या संदर्भात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत आज बैठक झाली.

ही बातमी पण वाचा : मला नोटीस पाठवलीत तर शिवसेनेची ‘ती’ प्रकरणं बाहेर काढेन ; नितेश राणेंचा वरुण सरदेसाईंना इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER