‘वंचित’च्या उमेदवारीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्या मुलाखती

congress - ncp- VBA

अकोला : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे. वंचितकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत असून रिसोड विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळावी यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी १५ जुलै रोजी अकोला येथे मुलाखती दिल्या. विविध पक्षांतील नेत्यांनी ‘वंचित’कडे उमेदवारी मागितल्याने जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे.

ही बातमी पण वाचा :- काँग्रेसला धक्का, माजी राष्ट्रपतींचे चिरंजीव ‘वंचित’च्या वाटेवर!

अकोला येथे १५ जुलै रोजी रिसोड विधानसभा मतदारसंघाकरिता इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये वंचित आघाडीबरोबरच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

ही बातमी पण वाचा:- विधानसभेसाठी कॉंग्रेस – राष्ट्रवादी अवलंबणार युतीचा फॉर्म्युला!

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक दिलीप जाधव, काँग्रेसचे माजी वाशिम शहर अध्यक्ष तथा वाशिमचे माजी नगराध्यक्ष दीपक भांदुर्गे, डॉ. प्रल्हाद कोकाटे, वंचित आघाडीचे प्रा. प्रशांत गोळे पाटील, जानकिराम डाखोरे, अनिल गरकळ, डॉ. रवींद्र मोरे पाटील, सुनील लहाने पाटील, डॉ. गजानन हुले आदींनी उमेदवारी मिळण्यासाठी मुलाखती दिल्या. यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, मी अकोला येथे गेलो होतो; परंतु यासंदर्भात कुठलेही बोलणे झाले नाही.