काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार भाजपच्या वाटेवर , पण उद्धव ठाकरेंशी चर्चा केल्यानंतर प्रवेश

uddhav and cm fadnavis

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीतील नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला . अद्यापही अनेक आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. मात्र ही निवडणूक शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार असल्याने या आमदारांच्या पक्षांतराबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून आमदारांच्या भाजप प्रवेशाबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती आहे .

ही बातमी पण वाचा : शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या कॉंग्रेसच्या नेत्याचा शिवसैनिकांकडूनचं विरोध

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये येण्यास इच्छुक असणारे अनेक आमदार हे युतीत शिवसेनेच्या मतदारसंघातील आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंशी चर्चा केल्याशिवाय या आमदारांना भाजपमध्ये एंट्री देणे सोपे नाही . सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार भारत भालके, आमदार सिद्धाराम म्हेत्रे तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्यातील बबन दादा शिंदे यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यासंदर्भात आज निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी विधानसभेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच आताही कॉंग्रेस आणि भाजपचे अनेक नेते भाजप आणि सेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अडचणी वाढणार आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप –सेना युतीची ताकद वाढत आहे. तर काँग्रेस -राष्ट्रवादी कमकुवत होताना दिसत आहे.

ही बातमी पण वाचा : हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये चालले असले तरी इंदापुरची जागा तर शिवसेनेकडे आहे