चंद्रकांत दादांच्या कोल्हापूरला जाण्यावरून काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून टोलेबाजी

ChandraKant Patil & Satej patil & Hassan Murshif

कोल्हापूर : पुण्यातील कार्यक्रमात मी कोल्हापूरला परत जाणार असं खेळीमेळीतच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) वक्तव्य केलं होते. “पुण्यात प्रत्येकालाच सेटल व्हावंसं वाटतं. पण, देवेंद्रजी मी कोल्हापूरला परत जाणार आहे, असं म्हणत पाटील यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. कोल्हापूरच्या मतदारसंघाकडे पाठ फिरवत पाटील यांनी पुण्यातील कोथरुड मतदारसंघाची निवड करत सोपी खेळी खेळली अशा आशयाचे अनेक आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते. किंबहुना हे आरोप सातत्याने सुरुच आहेत. परिणामी राजकीय कारकिर्दीतील पुढची निवडणूक ही कोल्हापुरातूनच लढणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. यावर आता भाजप पेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून प्रतिक्रीया येत आहेत.

प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी ‘मी कोल्हापुरात परत येणार यावर आधी अजित पवार (Ajit Pawar) यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावल्यानंतर हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) आणि सतेज पाटील (Satej Patil) यांनीही पाटील यांना आपल्या स्टाईलने चंद्रकांतदादा यांच्या घरवापसी वर टिप्पणी केली.

तुम्ही कोल्हापूरला या, जनता वाटच पाहत आहे, असे उत्तर दिले आहे. तर कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनीही चंद्रकांत पाटील यांना टोला लगावण्याची संधी सोडली नाही. “चंद्रकांतदादांचे विरोधक म्हणजे भाजप पक्षातील आहेत. कदाचित त्यांचा इशारा देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच असावा, अशी टिप्पनी केली.

विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर सोडून पुण्यातील कोथरुड मतदार संघ निवडला त्याचवेळी त्यांच्यावर टीका झाली होती. आता पाटलांनी कोल्हापूरला परत येणार असल्याचं वक्तव्य केल्यामुळे चर्चा सुरू झाली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “एक जण म्हणतो मी पुन्हा येईन, एक म्हणतो मी पुन्हा जाईन, मी पुन्हा येईन पण म्हणणार नाही, मी पुन्हा जाईन पण म्हणणार नाही…मी जनतेच्या सहकार्याने काम करत राहिन. पण मी पुन्हा जाईन म्हणणाऱ्यांना पुणेकरांनी बोलावलंच कुठे होतं? पाच वर्षांसाठी तुम्हाला निवडून दिलंय, वर्षाच्या आतच तुम्ही पुन्हा जाईन म्हणताय. मग काम घेऊन आलेल्या कोथरुडकरांना मी पुन्हा जाणार सांगणार का?”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER