अखेर झुंझ अपयशी ; खासदार राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

Maharashtra Today

पुणे :- गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी लढा देत काँग्रेसचे नेते राजीव सातव (Rajiv Satav) यांचे आज निधन (Pass Away) झाले . सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात मागील २० दिवसांपासून उपचार सुरू होते. सुरूवातील त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मात्र, नंतर त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती काँग्रेसकडून देण्यात आली होती. मात्र, दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती पुन्हा खालावली असल्याने ते व्हेंटिलेटर वर होते . काँग्रेसकडून यासंदर्भात वृत्त देण्यात आले. च्या निधनानंतर राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .

खासदार राजीव सातव यांना एप्रिल महिन्यात कोरोनाची (Corona) लागण झाली होती. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांना पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. अखेर उपचाराअंती 10 मे रोजी त्यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यामुळे लवकरच राजीव सातव यांना रुग्ण्यालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता होती. पण, अचानक राजीव सातव यांची प्रकृती खालावली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button