काँग्रेस खासदाराचे कोरोनाने निधन; पंतप्रधान मोदींकडून दुःख व्यक्त

Vasant Kumar-PM Modi

नवी दिल्ली : देशात कोरोनाचे संकट (Corona crises) दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . आतापर्यंत अनेक राजकीय नेतेही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत . काँग्रेसचे (Congress) कन्याकुमारीचे खासदार एच. वसंत कुमार (Vasant Kumar) यांचं कोरोना विषाणूच्या (Corona Virus) संसर्गामुळे निधन झालं आहे. त्यांच्यावर 10 ऑगस्टपासून चेन्नईमधील अपोलो रुग्णालयात उपचार सुरु होते. शुक्रवारी (28 ऑगस्ट) रात्री उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कुमार यांच्या निधनावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यासह राजकीय वर्तुळातील अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करत खासदार वसंतकुमार यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. ते म्हणाले, “लोकसभा सदस्य खासदास एच. वसंतकुमार यांच्या निधनाने दुःख झालं. त्यांचे व्यवसाय आणि सामाजिक कामातील प्रयत्न हे नोंद घेण्यासारखे आहेत. मी त्यांच्याशी ज्या ज्या वेळी भेटलो त्या त्या वेळी त्यांच्या तामिळनाडूच्या प्रगतीसाठीचे प्रयत्न पाहिले. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि समर्थकांप्रती सहवेदना. ओम शांती, असे मोदी म्हणाले.

तर राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की ,काँग्रसचे कन्याकुमारीचे खासदार एच. वसंतकुमार यांचं कोव्हिड 19 मुळे झालेलं निधन खूप धक्कादायक आहे. त्यांची लोकांची सेवा करण्याच्या काँग्रेसच्या विचारांशी निष्ठा नेहमीच मनात घर करुन राहिल. त्यांच्या कुटुंबीयांना आणि स्नेहींसोबत सहवेदना, असे राहुल म्हणाले.

दरम्यान खासदार वसंत कुमार दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. 2019 मध्ये ते लोकसभा निवडणुकीत विजय मिळवत पहिल्यांदाच खासदार झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER