काँग्रेस आमदाराच्या मुलाचा दारूच्या नशेत पोलिसांवर हल्ला

Police

नवी दिल्ली : कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे काँग्रेस आमदाराच्या मुलाने दारूच्या नशेत पोलिसांवर हल्ला केला. त्याला अटक करण्यात आली आहे. ही घटना रविवार रात्री साडेबाराच्या सुमाराची आहे. काँग्रेसचे आमदार नसीर अहमद यांचा मुलगा फैयाज याने बंगळुरूमधील अमृथल्ली पोलीस स्टेशनजवळ पोलिसांशी वाद घातला व पोलिसांवर हल्ला केला. पोलिसाला मारहाण केली आणि पळून गेला. तो काही वेळ फरार होता.

तो दारूच्या नशेत होता. फैयाजसोबत त्याच्या दोन साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे. बंगळुरू (उत्तर पूर्व) डीसीपी सी. के. बाबा यांनी दिलेल्या माहितीनुसार, उड्डाणपुलाजवळ पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. फैयाज याने पोलीस कर्मचाऱ्यांशी वाद घातला तेव्हा तो दारूच्या नशेत होता, असा आरोप आहे. एका हिंदी वेबसाईटने हे वृत्त दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER