काँग्रेसच्या ‘या’ आमदाराला कोरोनाची लागण

congress-mla-rituraj-patil-Corona Positive

मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट (Corona crises) वाढतच चालले आहे .राजकीय नेत्यांनाही कोरोनाने विळखा घातला असून आता आणखी एका काँग्रेस (Congress) आमदाराला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर येत आहे. कोल्हापूर इथले काँग्रेस आमदार ऋतुराज पाटील यांचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह (Corona Positive) आला आहे. कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह येताच त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर इथेच दाखल करण्यात आलं असल्याचं सांगण्यात येत आहे. तर पाटील यांच्या संपर्कात आलेल्यांनी खबरदारी घ्यावी, लक्षणं असल्यास तत्काळ टेस्ट करून घ्यावी असं आवाहन आमदार ऋतुराज पाटील (Rituraj Patil) यांनी केलं आहे.

दरम्यान माझी कोविड-१९ चाचणी करण्यात आली होती. काल रात्री रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने कोल्हापुरात उपचार सुरू आहेत. माझी तब्येत ठीक आहे, काळजी करू नये; पण माझ्या संपर्कात आलेल्यांनी योग्य ती काळजी घ्यावी, ही विनंती, असे ट्विट ऋतुराज पाटील (Rituraj Patil) यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER