पवारांच्या सूचनेचा राज्यात आदर होईल याची खात्री; काँग्रेसच्या मंत्र्यांकडून स्तुतीसुमने

Sharad Pawar-Nitin raut

नागपूर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सल्ला देतात. त्यांचा सल्ला ही एक सूचना असते, त्या सूचनेचा आदर राज्यात होईल, याची मला खात्री आहे, असं म्हणत काँग्रेस नेते आणि राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी शरद पवारांवर स्तुतीसुमने उधळली आहे. शरद पवार यांनी सामनाला दिलेल्या विशेष मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. ते शिवसेना शैलीत काम करतात, त्यांनी मित्रपक्षांशीही संवाद ठेवायला हवा, असं नमूद केलं होतं. त्यावर नितीन राऊत यांनी पवारांच्या विधानाचे समर्थन केले.

टीव्ही 9 मराठीशी बोलाताना नितीन राऊत म्हणाले की, महाराष्ट्र सरकारला कुठलाही धोका नाही. आमचं सरकारही मजबूत स्थितीत आहे. शरद पवार हे सल्ला देतात ती एक सूचना असते, त्या सूचनेचा आदर राज्यात होईल, याची मला खात्री आहे. नितीन राऊत यांनी मुख्यमंत्र्यांचं नाव न घेता, उद्धव ठाकरे यांनी मित्रपक्षांशी संवाद ठेवावा असंच नमूद केलं.

दरम्यान, कोरोनाच्या संकटाच्या काळात कुठल्याही राज्यच सरकार अस्थिर करणं योग्य नाही, राजस्थानमध्ये भाजपकडून घोडे बाजार सुरु आहे, राजस्थान सरकार अनुभवी नेत्याच्या हातात आहे. त्यामुळे राजस्थानमधील सरकार वाचेल, असं नितीन राऊत म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER