काँग्रेसचे नेते मंत्री दिल्लीत, आजच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष्यपदावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

Congress meeting

नवी दिल्ली :- हाराष्ट्र काँग्रेसमधील (Maharashtra Congress) सगळ्या मंत्र्यांना आज दिल्लीमध्ये हायकमांडने बोलावलं आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्यापुढे हे सगळे मंत्री हजर होणार आहेत. या बैठकीला राहुल गांधीही (Rahul Gandhi) उपस्थित राहतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एचके पाटील यांनी राज्यातल्या काँग्रेसच्या सगळ्या मंत्र्यांना दिल्लीत बोलावलं आहे. सकाळी 11 वाजता 10 जनपथ येथे ही बैठक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षावर आज तरी शिक्कामोर्तब होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), अशोक चव्हाण (Ashok Chavan), नितीन राऊत, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड यांच्यासह इतर मंत्री उपस्थित राहणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER