‘काँग्रेस मंत्र्यांना दारू विक्रेत्यांकडून मिळणारा मेवा जास्त महत्वाचा’, पडळकरांची विखारी टीका

gopichand padalkar - Maharastra Today

मुंबई :- फडणवीस सरकारच्या कार्यकाळात चंद्रपूर जिल्ह्यात लागू केलेली दारुबंदी गुरूवारी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने उठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक स्तरावरुन सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला जात आहे. दारूबंदीनंतर चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारू विकली जात होती. दारूबंदी उठवीण्यासाठी अडीच हजार निवेदने दिली होती. अवैध आणि निकृष्ट दर्जीची दारू जिल्ह्यात विकली जात होती. त्यामुळे दारूबंदीचे दुष्परिणाम दिसू लागल्याचे कारण पुढे करत महाविकास आघाडी सरकारने ही दारुबंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. आता या निर्णयाचा भाजपकडून विरोध केला जात आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

वसुली सरकारला काँग्रेस मंत्र्यांसाठी बहुजनांच्या हितापेक्षा दारू विक्रेत्यांकडून मिळणाऱ्या ‘मेव्या’चा ‘हेवा’ आहे. सरकारला हा मेवा जास्त महत्वाचा वाटतो, अशी घणाघाती टीका भाजप पडळकर यांनी केली. तसेच पुढे बोलताना पडळकर म्हणाले, मी यांना जाहीरपणे विचारतो. मेवा मिळत नसेल म्हणून तुम्ही बहुजनांचे हक्क मंत्रिमंडळात मांडत नसाल, तर मी माझ्या बहुजन बांधवांकडून आपल्यासाठी लोकवर्गणीने मेवा जमा करण्याचे आवाहन करू शकतो. वसुली करण्यासाठी राज्य सरकारने बहुजनांचे हक्क गहाण ठेवले आहेत. बहुजनांचे हक्क गहाण ठेवणाऱ्या या सरकारचा मी धिक्कार करतो, अशी घणाघाती टीकाही पडळकर यांनी केली.

Disclaimer:-बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button