अयोध्या कोणाच्या बापाच्या मालकीची नाही ; काँग्रेस नेत्याने केली उद्धव ठाकरेंची पाठराखण

Uddhav Thackeray & Vijay Wadeteriwar

मुंबई : अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) प्रकरणावरुन विश्व हिंदू परिषदेने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला होता . तसेच त्यांना अयोध्येत येऊ नका असे बजावले . यावरुन आता काँग्रेस मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांची पाठराखण करत विश्व हिंदू परिषदेवर निशाणा साधला आहे .

विश्व हिंदू परिषद धर्माचे मालक नाहीत, त्यांनी जास्त वळवळ करु नये, विश्व हिंदू परिषदेत केवळ हिंदू नाव आल्याने धर्म त्यांचा झाला का? आम्ही हिंदू नाही का? यांचे बापाचे आम्ही बांधील नाही. विश्व हिंदू परिषदेने राष्ट्रीय भानगडीत पडू नये, असे वडेट्टीवार म्हणाले .

अयोध्या कोणाच्या बापाच्या मालकीची नाही, कोणी कोणाला रोखू शकत नाही, हिंमत असेल तर रोखून दाखवावं. ज्या दिवशी वाटेल तेव्हा उद्धव ठाकरे जातील. हा प्रश्न धार्मिक भावनेचा आहे. अयोध्या आंदोलन विश्व हिंदू परिषद कुठे होती असा सवालही मंत्री विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER