१० टक्के कोरोना रुग्ण; काँग्रेस नेत्याची केंद्र-राज्य सरकारला एकत्र येण्याची विनंती

Central-State Government

मुंबई :- महाराष्ट्र कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईला वाचवण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने एकत्र यायला हवे, असे मत काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी व्यक्त केले. नव्या कोरोना (Corona) रुग्णांपैकी १० टक्के रुग्ण हे एकट्या मुंबईत आहेत. देशाच्या एकूण सकल राष्ट्रीय उत्पादनात (GDP) मुंबईचा वाटा ६ टक्के इतका आहे. त्यामुळे मुंबईला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मिलिंद देवरा (Milind Deora) म्हणाले.

यासंदर्भात मिलिंद देवरा यांनी ट्विट केले आहे. देशाचे आर्थिक हित जपण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने एकत्र यावे. वेगाने मुंबईत लसीकरण करावे. प्रत्येक मुंबईकराला लस दिली पाहिजे, असे मिलिंद देवरा यांनी सांगितले.

२४ तासांत ४० हजार ४१४ नवे रुग्ण
गेल्या २४ तासांत रविवारी राज्यात ४० हजार ४१४ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर दिवसभरात १४ हजार ८७४ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. १०८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबादसह इतर शहरांतही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्य सरकारच्या नियमानुसार, रविवारपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर, इतर जिल्ह्यातही लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. इतकेच नाही, तर संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.

कोरोना स्थिती
मुंबईत रविवारी दिवसभरात ६ हजार ९२३ जणांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले  आहे. तर ३ हजार ३८० जण कोरोनामुक्त झालेत. मुंबईत  दिवसभरात ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात ७ जणांना दीर्घकालीन आजार होते. मृतांपैकी ६ पुरुष तर २ महिलांचा समावेश आहे. बरे होणाऱ्या रुग्णांचा दर ८६ टक्क्यांवर आला आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी ५८ दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे मुंबईकरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button