विधानपरिषद निवडणुक : वनकर-हुसैन यांच्या उमेदवारीवरुन काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य ?

aniruddha-vaankar-muzaffar-hussain-candidature

मुंबई : महाविकास आघाडीकडून (MVA) विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी १२ नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे शुक्रवारी सोपवण्यात आली. विधानपरिषदेवरील जागांच्या निवडणुकीवरुन काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य बघायला मिळत आहे. काँग्रेसकडून अनिरुद्ध वनकर (Aniruddha-vankar)आणि मुजफ्फर हुसैन (muzaffar,hussain) यांना संधी देण्यात आली आहे. मात्र या दोघांच्या उमेदवारीवरुन पक्षात नाराजी असल्याची चर्चा आहे. तर तिकीट डावलल्याने काँग्रेसचे नेते नसीम खानही नाराज झाल्याचे बोलले जात आहे.

राज्यपाल नियुक्त सदस्यत्वासाठी काँग्रेसकडून सचिन सावंत, रजनी पाटील, मुजफ्फर हुसैन आणि अनिरुद्ध वनकर यांना विधानपरिषदेवरील उमेदवारी देण्यात आली आहे. आंबेडकर चळवळीतील गीतकार आणि संगीतकार असलेल्या अनिरुद्ध वनकर यांच्या नावावरुन विदर्भातील काही काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी होती. मात्र नाराजीकडे दुर्लक्ष करत वनकर यांनी संधी मिळाल्याने काही जण नाराज असल्याची माहिती आहे.

दुसरीकडे, मिरा भाईंदरमधील काँग्रेस नेते मुजफ्फर हुसैन यांना तिसऱ्यांदा विधानपरिषदेवर संधी देणे मुंबई काँग्रेसमधील नेत्यांना नापसंत असल्याची चर्चा आहे. या आधी हुसैन दोन वेळा काँग्रेसकडून विधान परिषदेवर निवडून आले होते. मात्र पुन्हा त्यांनाच संधी दिल्यामुळे पक्षात काही जण नाराज असल्याची माहिती आहे. हुसैन हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. विधानपरिषदेवर संधी न मिळाल्याने काँग्रेसचे नेते नसीम खान नाराज असल्याचंही बोललं जातं. नसीम खान हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी वस्त्रोद्योग मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER