कॉंग्रेस नेत्यांनी केली शिवसेनेची पक्षश्रेष्टींसमोर तक्रार

Shivsena-Congress

नवी दिल्ली : महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) किमान सामान कार्यक्रमाचे पालन होत नसल्याचे गान्हाणे राज्यातील काँग्रेस (Congress) नेतृत्वाने पक्षश्रेष्टींसमोर मांडले. महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल नसल्याने मतभेद आता दिल्लीपर्यंत पोहोचले आहे.

पक्षाचे संघटन महासचिव के.सी. वेणुगोपाल (K. C. Venugopal) यांच्या अध्यक्षेतखाली ही बैठक पार पडली. राज्यात मंत्रालयाअंतर्गत तसेच पक्षाअंतर्गत करण्यात आलेल्या कामांसंबंधी सर्व नेत्यांसोबत बैठकीत चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे पक्षश्रेष्ठींनी यावेळी प्रत्येक नेत्यांसोबत वैयक्तिक चर्चा केली. जवळपास तीन तास चाललेल्या या बैठकीचे राज्यातील राजकीय स्थिती संबंधी सखोल चर्चा करण्यात आली.

औरंगाबादचे (Aurangabad) संभाजीनगर (Sambhajinagar) असे नामांतरनाच्या विषयावर काँग्रेस दुखावली आहे. शिवसेना (Shiv Sena) आणि काँग्रेस नेत्यांमध्ये दरम्यानच्या काळात वाकयुद्ध रंगले. यावेळी देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी शिवसेनेला किमान समान कार्यक्रमाची आठवण करून दिली होती. आता काँग्रेस मंत्र्यांनी पक्षश्रेष्टींकडे नाराजी व्यक्त केल्याने पक्षश्रेष्टी यासंदर्भात काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला लवकरच नवीन तरुण चेहरा अध्यक्ष म्हणून मिळणार असल्याचे संकेत काँग्रेस पक्षश्रेष्टींनी दिले आहेत. प्रदेशाध्यक्ष पदासाठी नवीन नावांसंदर्भात सविस्तर चर्चा झाल्याची माहिती काँग्रेस पक्षाचे राज्य प्रभारी एच.के. पाटील यांनी दिली. मुंबई काँग्रेस मध्ये बदल झाला, आता महाराष्ट्र काँग्रेस मध्ये बदल अपेक्षित असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. परंतु, प्रदेशाध्यक्ष पदाची चर्चा फार काळ लांबल्याने बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली. पक्षश्रेष्ठींना तातडीने निर्णय घ्यावेत, अशी मत बैठकीनंतर थोरात यांनी व्यक्त केले. बैठकीत राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या समन्वयासंबंधी चर्चा झाली असून काही मुद्द्यावर राष्ट्रवादी (NCP) तसेच शिवसेनेसोबत चर्चा सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER