दिल्लीतील काँग्रेसचे नेते शिवसेनेसोबत आघाडीसाठी अनुकूल नव्हते : अशोक चव्हाण

Ashok Chavan

परभणी :- महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेसोबत आघाडी करण्यास दिल्लीतील काँग्रेस नेते अनुकूल नव्हते. पण राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या आग्रहामुळे महाविकास आघाडी अस्तित्वात आली, असे काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी सांगितले.

ते म्हणाले, शिवसेनेसोबत युती करायची की नाही याबाबत दिल्लीतील काँग्रेसचे नेते संभ्रमात होते; पण भाजपाला रोखण्यासाठी शिवसेनेबरोबर आघाडी करावी, असे राज्यातील काँग्रेस नेत्यांचे मत होते. भाजपाने काँग्रेस संपवण्याचे काम सुरू केले होते. त्यामुळे काँग्रेस शिवसेनेसोबत येण्यास तयार झाला, असे चव्हाण यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेसला राम राम ठोकणारे परभणीतील बडे नेते सुरेश नागरे यांनी पक्षात घरवापसी केली. अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER