शिवसेना-राष्ट्रवादीबद्दल काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली नाराजी

Congress & Shivsena & NCP - Maharastra Today

नवी दिल्ली : शिवसेना (Shiv Sena) -राष्ट्रवादीबद्दल (NCP) काँग्रेसच्या (Congress) नेत्यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसच्या मंत्र्यांचे सरकारमध्ये ऐकले जात नाही, अशी काँग्रेस नेत्यांची तक्रार आहे. शिवसेनेला किमान समान कार्यक्रमाची आठवण करून द्या, अशी विनवणी पक्षश्रेष्ठींकडे केली.

एका वृत्तवाहिनीने म्हटले आहे की, महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांची दिल्लीत पक्षश्रेष्ठींबरोबर बैठक झाली. पक्षश्रेष्ठीनी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेतला. सरकार चालवताना कोणत्या अडचणी येत आहेत, यावरही चर्चा झाली. सरकारमध्ये निर्णय घेताना आणि काम करताना अडचणी येत आहेत. अधिकारी नियुक्तीचे अधिकार दिले जात नाही. अशी काँग्रेस मंत्र्यांची नाराजी आहे.

सरकार किमान समान कार्यक्रमावर चालावे, कट्टरता आणि धार्मिक अजेंडा घेता येणार नाही, अशा सूचना पक्षश्रेष्ठींनी मंत्र्यांना केल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER