अशोक चव्हाणांच्या प्रकृतीसाठी सिद्धिविनायक चरणी साकडे; काँग्रेस नेत्याचा ३३ किमी पायी प्रवास

Ashok Chavan

मुंबई :- माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली आहे. चव्हाण हे कोरोनाबाधित असल्याचे निदान झाल्यानंतर प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी ठाण्यातील काँग्रेस नेत्याने मुंबईतील सिद्धिविनायकाला साकडे  घातले.  या तब्बल ३३ किमीची पायपीट करून सिद्धिविनायक मंदिर गाठले  आणि गणपतीबाप्पाकडे साकडे  घातले. हे अंतर कापण्यासाठी या पदाधिकाऱ्याला तब्बल साडेपाच तास चालावे लागले.

ठाणे शहरातील काँग्रेसचे प्रवक्ते मेहेर चौपाने यांनी आपल्या नेत्याच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी बाप्पाकडे साकडे  घातले आहे. कोरोनाविरोधात सर्व यंत्रणा लढा देत आहेत. राज्यातील काही नेत्यांनाही कोरोनाची लागण झाली. काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी या रोगाविरोधात यशस्वी लढाही दिला. त्यांना बरे वाटल्यानंतर काहीच दिवसांनी काँग्रेसच्या अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली. त्यांना बरे वाटावे याकरिता बुधवारी चौपाने घरून पायी सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी निघाले. त्यांनी ३३ किलोमीटर अंतर साडेपाच तासांत कापले . मात्र, मंदिर हे दर्शनासाठी बंद असल्याने मेहेर यांनी बाहेरूनच बाप्पाची पूजा केली आणि आपल्या नेत्याची प्रकृती सुधारावी यासाठी प्रार्थना केली.

दरम्यान कोरोनाने मुंबईत थैमान घातले आहे. कोरोनाविरोधात लढा देणारी आरोग्य यंत्रणा, पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनाही विळखा घातला आहे. राज्यातील काही नेत्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. राज्यातील एका राजकीय पक्षाचा नेता कोरोनातून बरा झाल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि वरिष्ठ मंत्र्यालाही कोरोनाची बाधा झाली आहे. या मंत्र्याच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी त्यांचे समर्थक प्रार्थना करत आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER