नवी मुंबईत मनसेचा काँग्रेसला धक्का; असंख्य समर्थकांसह काँग्रेस नेत्याचा मनसेत प्रवेश

MNS

नवी मुंबई :- पुढच्या काही महिन्यांतच नवी मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जय्यत तयारी केली जात आहे. आपले जास्तीत जास्त नगरसेवक निवडून यावे यासाठी पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. तर इतर पक्षांतील  नेत्यांना हेरून त्यांना आपल्या पक्षात घेण्याचे कामही धडाक्यात सुरू आहे. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.

राजसाहेब ठाकरे (Raj Thackeray) ह्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन नवी मुंबई काँग्रेस पक्षाचे कोपरखैरणे तालुका सरचिटणीस सुधीर पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांच्या या मनसेप्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button