शिवसेनेचं ओझं कधीपर्यंत सहन करणार?’ काँग्रेस नेत्याचा पक्षाला घरचा अहेर

Sanjay Nirupam slams Shiv Sena .jpg

मुंबई : आक्षेपार्ह व्यंगचित्र व्हॉट्सअ‍ॅपवर फॉरवर्ड केल्यामुळे मुंबईत शिवसैनिकांनी (Shivsena) ६५ वर्षीय निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार काल (शुक्रवार) समोर आला होता. यावरून विरोधकांनी शिवसेनेवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. मात्र महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेसच्या (Congress) नेत्याने शिवसेनेवर घणाघाती टीका केली.

ही बातमी पण वाचा:- ‘सत्तेची मस्ती बघा, आयुष्भर कोण सत्तेत राहत नाही’, निलेश राणेंचा शिवसेवर हल्ला

शिवसेनेत बदल आलेला नसून आजही गुंड पार्टीच आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी केली. हे सरकार पुरस्कृत गुंडगिरी आहे. शिवसेनेचं ओझं काँग्रेस कधीपर्यंत सहन करणार आहे हे विचारायला हवं, असं म्हणत त्यांनी पक्षाला घरचा अहेर दिला. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. यावेळी निरुपम म्हणाले की, अधिकाऱ्याला केलेली मारहाण ही सरकार पुरस्कृत गुंडगिरी आहे.

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना राज्य सरकार, पोलिसांकडून अभय दिलं जात असून ही अतिशय चिंताजनक बाब आहे. त्यामुळे शिवसेनेचं पितळ उघडं पडत आहे. शिवसेना गुंडा पार्टी असून आजही त्यांचा गुंडगिरी करण्यावरच विश्वास आहे. जे कालच्या घटनेवर स्पष्ट दिसलं आहे, असं संजय निरुपम यांनी म्हटलं आहे. पुढे त्यांनी सांगितलं की, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्यांना शिवसेनेसोबत सत्तेत बसण्यामध्ये धन्यता वाटत आहे त्यांना शिवसेनेचं ओझं कधीपर्यंत सहन करणार आहात हे विचारायला हवं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER