मुख्यमंत्री शिवसेनेचा, त्यांना कोणी रोखलंय? शिवसेना-राष्ट्रवादीच्या वादात काँग्रेसची उडी

Sanjay Nirupam - Uddhav Thackeray - Maharastra Today

मुंबई : राष्ट्रवादीचे (NCP) नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना अपघाताने गृहमंत्रिपद मिळाले, असे शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामनाच्या रोखठोकमध्ये म्हटले आहे . संजय राऊत यांनी देशमुख यांच्यावर केलेल्या टीकेमुळे शिवसेना-राष्ट्रवादी यांच्यात वादंग पेटले आहे .

त्यातच आता काँग्रेसचे (Congress) माजी खासदार संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी शिवसेनेला लक्ष्य केले आहे. शिवसेनेनं महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या वर्तणुकीवर शंका उपस्थित केली आहे. गृहमंत्र्यांच्या भविष्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असं राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे आणि त्यांनी मौन धारण केले आहे. त्यांना कारवाई करण्यापासून कोणी रोखले आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान पोलीस आयुक्तांनी चुका केल्या. त्यामुळे त्यांना जावं लागलं असं एक विधान देशमुखांनी करताच परमबीर सिंग यांनी १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट गृहमंत्र्यांनी कसं दिलं होतं, अशा पत्राचा स्फोट केला. पोलीस आयुक्त, गृहमंत्री, मंत्रिमंडळातील प्रमुख लोक यांचा लाडका व भरवशाचा असलेला सचिन वाझे फक्त साधा सहायक पोलीस निरीक्षक होता. त्याला मुंबई पोलिसांचे अमर्याद अधिकार कोणाच्या आदेशाने दिले हा खऱ्या चौकशीचा विषय आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयात बसून वाझे वसुली करीत होता तर गृहमंत्र्यांकडे याबाबत माहिती का नसावी? असा ‘रोखठोक’ सवाल राऊत यांनी विचारला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button