मे महिन्यातच बोललो होतो, पावसात पूर्ण मुंबई शहर बुडेल- संजय निरुपम

Sanjay Nirupam & Mumbai Rain

मुंबई :मुंबईत (Mumbai) अनेक भागांत पूरस्थिती आहे. प्रशासनाकडून आजही नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईत चोहीकडे पाणीच पाणी साचले आहे. यावरून कॉंग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी महाराष्ट्र सरकारवर टीकेचे बाण सोडले आहे. दक्षिण मुंबईत काल एनडीआरएफच्या टीमने लोकांना साचलेल्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढले. येथील साचलेल्या पाण्याची स्थिती संजय निरुपम यांनी सांगितली आहे.

मी आधीच बोललो होतो, पावसात मुंबई शहर बुडेल, असे संजय निरुपम (Sanjay Nirupam) म्हणाले. दक्षिण मुंबईचे हे दृश्य आहेच. रस्ते, रुग्णालये आणि पोलीस स्टेशन सर्व आजच्या पावसात बुडाले. मे महिन्यातच मी म्हणालो होतो की, ड्रेनेज साफ करणे केवळ २० टक्के आहे.

मुसळधार पाऊस पडल्यास संपूर्ण शहर बुडेल. आज मुंबईतही तेच वातावरण होते.  असे ट्विट कॉंग्रेस (Congress) नेते संजय निरुपम यांनी केले आहे. दरम्यान, मुंबईत काल दुपारपासून विक्रमी पाऊस झाला. कुलाबा, नरीमन पॉइंट, हाजी अली परिसरात धुवाधार पाऊस होता. चार तासांत ३०० मिमी पाऊस पडला. या धुवाधार पावसाने मुंबईत अनेक भागांत पूरस्थिती होती. एनडीआरएफच्या टीमला बोलावून लोकांना बाहेर काढावे लागले. मशीद  आणि भायखळ्यादरम्यान दोन लोकलमध्ये अनेक नागरिक अडकले होते. एनडीआरएफच्या टीमने बोटीच्या साहाय्याने त्यांना सुखरूप स्थळी पोहचवले. शरद पवार (Sharad Pawar) यांनीदेखील आयुष्यात पहिल्यांदाच मंत्रालयासमोर एवढे पाणी साचल्याचे पाहतोय, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, आयुक्त इकबाल चहल यांनीही कालच्या पावसाला विक्रमी पाऊस झाल्याचे म्हटले आहे. “मुंबईत काल जो पाऊस आणि वारा होता, ते एकप्रकारचं वादळच म्हणावं लागेल.” असं इक्बाल चहल म्हणाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER