पक्षाअंतर्गत कलहाकडे प्रदेशाध्यक्षकांच जातीने लक्ष्य

raju-waghmare

नागपूर : पुढील वर्षी होणाऱ्या महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपने स्वबळावर पालिकेची सत्ता काबीज करण्याचा निर्धार केला आहे. तर शहर काँग्रेस पक्षात अंतर्गत कलह आजही कायम आहे. आणि कलहाची झळ निवडणुकीत बसू नये, यासाठी प्रदेशाध्यक्ष स्वताःह लक्ष ठेऊन असल्याची माहिती प्रदेश काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी दिली आहे.

गांधी जयंती आणि नोटबंदीच्या जनआक्रोश आंदोलनात याची प्रचिती आली. गांधी जयंतीच्या आंदोलनात शहर काँग्रेसचे वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले. जनआक्रोश आंदोलनात शहराध्यक्ष विकास ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांच्या नेतृत्वात व्हेरायटी चौकात मार्च काढण्यात आला तर, काँग्रेसच्या दुसऱ्या गटातर्फे नितीन राऊत व कृष्णकुमार पांडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. काँग्रेसचे नेते व माजी मंत्री नितीन राऊत हे शहराध्यक्ष विकास ठाकरे व विलास मुत्तेमवार यांच्या कार्यप्रणालीवर नाराज असल्याची चर्चा राजकीय वतुर्ळात रंगली आहे़ निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील अंतर्गत कलहाने काँग्रेस पक्षश्रेष्ठी विचारात पडले आहे. यासंदर्भात बोलताना राजु वाघमारे यांनी पक्षातील विवादावर खुद्द प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण जातीने लक्ष घालत असल्याचे शिक्कामोर्तब केले.

लोकसभे नंतर विधानसभेच्या निवडणुकीत अपयशा नंतर महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस पक्षाने वादावर विराम लावून एकीचेबळ दाखविण्याचा संकल्प केला खरा मात्र, काँग्रेसच्या संकल्पाला पुन्हा ग्रहण लागले. आता, निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा काँग्रेस पक्षातील दुफळी चर्चेचा विषय ठरली आहे. महापालिकेच्या निवडणुकीची व्युवरचना आखण्यासाठी आलेल्या प्रदेश प्रवक्ते राजु वाघमारे यांना पक्षातील दुफळीबाबत विचारणा केली असता त्यांनी, नागपूर शहरात सक्षम अनुभवी नेता असल्याचे सांगत पक्षातील वाद-विवादावर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण लक्ष ठेऊन असल्याचे स्पष्ट केले.