काँग्रेस नेते राजीव सातव व्हेंटिलेटरवर; राज्यमंत्री विश्वजित कदम यांची माहिती

Rajiv Satav - Vishwajeet Kadam

मुंबई :- काँग्रेस पक्षाचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांना कोरोनाची (Corona) लागण झाल्यानंतर त्यांच्यावर पुण्याच्या जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सकाळपासूनच खालावली आहे. राज्यमंत्री आणि काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी राजीव सातव (Rajiv Satav) यांच्या प्रकृतीविषयी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे.

राजीव सातव यांना १९ एप्रिलला कोरोना आजाराची लक्षणे दिसून आली. त्यानंतर त्यांनी २१ एप्रिलला तपासणी केल्यावर, त्यांना कोरोना झाल्याचे २२ एप्रिलला आलेल्या रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले. या आजारावर उपचार घेण्यासाठी ते पुण्यातील जहांगीर रुग्णालयात २३ एप्रिलला दाखल झाले. त्यांची प्रकृती २३ ते २५ तारखेच्या दरम्यान उत्तम होती. पण त्यानंतर बिघडली. त्यामुळे त्यांना तत्काळ आयसीयूमध्ये उपचारांसाठी दाखल केले गेले. तेथून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रेमडेसिवीर आणि अन्य इंजेक्शन देण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र, त्याच दरम्यान त्यांची प्रकृती अजून बिघडल्याने कालपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button