काँग्रेस नेते राजीव सातव यांची कोरोनावर मात, लवकरच डिस्चार्ज

Maharashtra Today

पुणे : काँग्रेसचे नेते तसंच खासदार राजीव सातव|(Rajiv Satav) कोरोनामुक्त झाले आहेत. तब्बल १९ दिवसांनी त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे आता लवकरच राजीव सातव यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.

23 एप्रिलपासून राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहाँगीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोविड-१९ पॉझिटिव्ह आल्यानंतर खासदार राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असून त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने ते कोरोनामुक्त झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर ते आता व्हेंटिलेटर शिवाय देखील श्वास घेऊ शकतात, असंही डॉक्टरांचं म्हणण आहे. येत्या काही दिवसांमधे राजीव सातव यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येईल असंही डॉक्टर म्हणाले.

४५ वर्षीय राजीव सातव हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) चे गुजरात प्रभारी आहेत, तर काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक आहेत. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार होत्या. शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडेंना पराभूत करुन राजीव सातव २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत हिंगोलीतून खासदार म्हणून निवडून आले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button