“प्रियंका चोप्रा जिंदाबाद!” काँग्रेसच्या सभेत दिल्या घोषणा

congress-leader-raised-slogan-priyanka-chopra-zindabad-in-congress-rally

नवी दिल्ली :- काँग्रेसच्या एका सभेत सोनिया गांधी जिंदाबाद… काँग्रेस पार्टी जिंदाबाद… राहुल गांधी जिंदाबाद… प्रियंका चोप्रा जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. याचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सभेला जोरदार प्रसिद्धी मिळाली आहे.

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात ही सभा रविवारी आयोजित करण्यात आली होती. सभेत दिल्ली काँग्रेसचे नेते सुभाष चोप्राही उपस्थित होते. काँग्रेसचे नेता सुरेंद्र कुमार यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी घोषणा देणे सुरू केले – सोनिया गांधी जिंदाबाद… काँग्रेस पार्टी जिंदाबाद… राहुल गांधी जिंदाबाद… आणि प्रियंका (गांधींऐवजी) चोप्रा, कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिला जिंदाबाद !

सुरेंद्र कुमार यांना आपली चूक लक्षात आली पण तोपर्यंत उशीर झाला होता. घडलेला प्रकार पाहून सुभाष चोप्राही इकडे तिकडे बघू लागले. हा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर इतका व्हायरल झाला की प्रियंका चोप्रा ट्विटवर टॉप ट्रेण्डींग टॉपिक होती. “नशीब राहुल गांधी या सभेला नाही आले नाहीतर येथे राहुल बजाज जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या असत्या,” असा टोमणा एका युझरने ट्विट करताना लगावला आहे. तर दुसऱ्या एका व्यक्तीने “प्रियंका चोप्रा काँग्रेसमध्ये कधी गेली?” असा सवाल उपस्थित केला.