काँग्रेस नेते राहुल गांधींचा ‘हॅलो डॉक्टर’ अभियानातून रुग्णांसाठी पुढाकार

Rahul Gandhi-CONGRESS

मुंबई : देशभरात कोरोनाचे संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर या संकटमय काळात नागरिकांच्या मदतीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी सरसावले आहेत. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ‘हॅलो डॉक्टर’ नावाची संकल्पना पुढे आणली आहे. या माध्यमातून रुग्णांना डॉक्टर आणि मनोविकारतज्ज्ञांकडून सल्ला देण्यात येणार आहे. यासाठी त्यांनी डॉक्टर आणि तज्ज्ञ मंडळींना या अभियानासोबत जोडण्याचे आवाहन केले आहे.

भारतातील प्रत्येक नागरिकाला आता एकमेकांसोबत उभं राहण्याची गरज आहे. वैद्यकीय सल्ल्यासाठी आम्ही हेलो डॉक्टर हे अभियान राबवत आहोत. सल्ल्यासाठी +९१९९८३८३६८३८ या क्रमांकावर फोन करा. तसेच डॉक्टर आणि मानसोपचार तज्ज्ञांनी या अभियानात सहभागी व्हावे , असे आवाहन त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button