मान आणि सन्मानाने लढणाऱ्या शेतकऱ्यांसोबत…; राहुल गांधींनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा

Rahul Gandhi

मुंबई :  काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नवीन वर्ष (New Year) सुरु होत असताना ज्यांना आपण गमावलं आहे त्यांची आठवण काढत आहोत. तसंच ज्यांनी आपली सुरक्षा केली आणि बलिदान दिलं त्या सर्वांचे आभार मानत आहोत. मी मान आणि सन्मानाने अन्यायाविरोधात लढणाऱ्या शेतकरी आणि कामगारांसोबत आहे. सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

राहुल गांधी यांनी नववर्षाच्या शुभेच्छा देताना दिल्लीत वेशीवर कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे. गेल्या एका महिन्यापासून पंजाब, हरियाणा आणि इतर राज्यांमधील शेतकरी कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. कृषी कायदे रद्द व्हावेत या मागणीवर शेतकरी आंदोलन करीत आहेत .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER