खुशबू दिल्लीकडे रवाना, भाजप प्रवेशाची शक्यता

Kushboo Sundar

चेन्नई : अभिनेता-राजकारणी खुशबू सुंदर (Kushboo Sundar) यांनी आज कॉंग्रेसपक्षाला (Congress) रामराम ठोकला असून, त्या भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. २०१४ पासून त्या काँग्रेस नेता बनून काम करत असून काही दिवसांपूर्वीच भाजपा प्रवेशाचे वृत्त त्यांनी फेटाळले होते. मात्र, आता पुन्हा एकदा त्यांच्या भाजपा (BJP) प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले असून त्या दिल्लीसाठी रवाना झाल्या आहेत.

तामिळनाडूत २०२१ मध्ये विधानसभेच्या निवडणुका संपन्न होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर तेथील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच, खुशबू सुंदर यांच्या माध्यमातून दक्षिणच्या राजकीय मैदानात भाजपा जोमाने उतरण्याची रणनीती आखली आहे. दोन दिवसांपूर्वीचं त्यांचं ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER