नारायण राणेंना त्यांचाच पक्ष किंमत देत नाही ; काँग्रेस नेत्याचा हल्लाबोल

Eknath Gaikwad-Narayan Rane.jpg

मुंबई : काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड (Eknath Gaikwad) यांनी भाजप  (BJP) नेते नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर सडकून टीका केली आहे.

नारायण राणेंना भाजपात कोण विचारतंय? हे पंचांग घेऊन बसले आहेत. दरवेळी नव्या तारखा देण्यात काय तथ्य? त्यांचा पक्ष त्यांना किंमत देत नाही तर इतर काय देणार? सरकार आलं नाही म्हणून तडफड सुरू आहे, असा घणाघात गायकवाड यांनी केला.

शेतकरी आंदोलनात मृत्यू झालेल्या कुटुंबियांना शहिदांचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी स्लमसेलकडून श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमात एकनाथ गायकवाड सहभागी झाले होते. यावेळी ते बोलत होते .

राणे यांनी ठाकरे सरकार कोसळण्याची आणखी एक डेडलाईन जाहीर केली आहे. येत्या 2021 च्या मार्च महिन्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळेल, असा दावा त्यांनी पुन्हा एकदा केला आहे, यावरूनच गायकवाड यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER