
मुंबई : नाना पटोलेंनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच रहाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र हे पद आता खुलं झालं आहे असं म्हटलं होतं. पण कुणाकडे कुठली पदं राहतील हे सरकार बनतानाच निश्चित झालं आहे आणि त्यात फार बदल होण्याची शक्यता नसल्याचं जाणकारांना वाटतं. त्यामुळे काँग्रेसकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी आदिवासी मंत्री कागदा चांद्या पाडवी म्हणजेच के. सी. पाडवी (K C Padvi) यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे.
पाडवी हे काँग्रेस निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. अलिकडेच सोनियांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून, आदिवासी, मागास वर्गासाठी खास निधीची मागणी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर पाडवींना अध्यक्ष केलं तर आदिवासी समाजात चांगला मेसेज पोहोचेल असं गणित मांडलं जात आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला