मंत्री आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ निर्णयाने काँग्रेस नाराज, राज्यपालांना दखल देण्याची मागणी

Aaditya Thackeray

मुंबई :- मागील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात शिवसेनेने, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार स्थापन केले. राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेत्रीत्वात आघाडीचे सरकार असले तरीही आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील संबंध अधिकच ताणले जात आहे. महापालिकेत सत्ताधारी असणाऱ्या शिवसेनेवर टीका करण्याची संधी काँग्रेस सोडत नाही, विविध मुद्द्यावरून काँग्रेस नेते शिवसेनेला लक्ष्य करताना दिसत असतात.

आता काँग्रेस नेते जर्नादन चांदूरकर यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना (Aaditya Thackeray)लक्ष्य केले आहे. जर्नादन चांदूरकर यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून म्हटले आहे की, राज्याचे पर्यावरण आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी शहरातील ४३ शिवसेनेच्या नगरसेवकांसाठी ३ हजार ६९३ कोटी रुपये ब्युटीफिकेशनसाठी डीपीडीसीच्या फंडातून काम करण्यासाठी दिले आहेत. हा आदेश मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केला असून पुढील कार्यवाहीसाठी म्हाडाकडे गेली आहे. मुंबईत पैसे आले त्याचा आनंद आहे, परंतु येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेऊन शिवसेनेच्या ४३ नगरसेवकांच्या मतदारसंघात ब्युटिफिकेशनचं असं काम डीपीडीसीच्या इतिहासात पहिल्यांदाच मंजूर करण्यात आलं आहे. ही बाब घटनाबाह्य आहे असं त्यांनी सांगितलं आहे.

त्याचसोबत या प्रकाराची सर्व राजकीय पक्षांनी तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी (Bhagat Singh Koshyari) या बाबीची वेळीच दखल घेतली पाहिजे. कारण आर्थिक शिस्तीनुसार डीपीडीसी फंडासाठी अर्थसंकल्पात तशी तरतूद करावी लागते, अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) ही तरतूद केली आहे, बजेटमधील फंड वगळून ३ हजार ६९३ कोटीचा निधी मंजूर केला हा कुठून येणार? याची पुरवणी मागणी अजित पवारांना विधानसभेत सादर करावी लागेल, अजित पवारांना याची माहिती असेल तर ठीक अन्यथा अर्थ विभागालाही हे आव्हान ठरणार आहे. म्हणून सगळ्यांना सारखा न्याय द्यायचा हे तत्व शिवसेनेला मान्य नाही, ही घटनाबाह्य बाब असल्याने या प्रकाराकडे लक्ष द्यावं, सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती आहे, की बेकायदेशीर आदेश असतील तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे ते मंजूर करू नये असं आवाहनही जर्नादन चांदूरकर यांनी केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button