…तर काँग्रेस लोकांमध्ये संभ्रम पसरवतंय; जे. पी नड्डांची टीका

J. P. Nadda

नवी दिल्ली : कोरोनाच्या (Corona Virus) दुसऱ्या लाटेचा उद्रेक देशभरात कायम आहे. नवीन कोरोनाबाधितांची संख्या काहीशी घटताना दिसत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा (J. P. Nadda) यांनी भाजपच्या (BJP) खासदारांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आणि देशातील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी डिसेंबरपर्यंत सर्वांना कोरोना लस उपलब्ध करून दिली जाणार आहे, असे आश्वासन त्यांनी दिले.

तसेच काँग्रेसने (Congress) लोकांमध्ये भीती निर्माण केल्याची टीका नड्डा यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी कोरोनाची दुसरी लाट येण्यापूर्वी सर्व राज्ये आणि मुख्यमंत्र्यांना तयारी करण्यास सांगितले होते. देशात फक्त नऊ महिन्यांतच दोन भारतीय लसी तयार करण्यात आल्या. आतापर्यंत १८ कोटींहून अधिक देशवासीयांचे लसीकरण करण्यात आले आहे. डिसेंबरच्या शेवटी देशातील सर्व नागरिकांना लस देण्यात येईल. यासाठी वेळ निश्चित केली जात आहे, अशी माहिती नड्डा यांनी दिली.

काँग्रेस लोकांमध्ये संभ्रम पसरवतंय
‘टूलकिट’ प्रकरणामुळे काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे. पंतप्रधान मोदी अविरतपणे देशातील जनतेची सेवा करत आहेत आणि काँग्रेस लोकांमध्ये संभ्रम पसरवून भीती निर्माण करत असल्याची टीका जे. पी. नड्डा यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button