काँग्रेस हा पक्ष संपला आहे : प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar

सांगली :- काँग्रेस हा पक्ष संपला आहे. ऐन निवडणुकीत हॉलिडेमूडमध्ये असणाऱ्या नेत्यांच्या पार्टीला काय भवितव्य असणार ? अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे (VBA) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता केली. ते म्हणाले, आम्ही काँग्रेसला (Congress) दोन वेळा वाचवायचा प्रयत्न केला; पण काही उपयोग झाला नाही. वंचितसोबत आघाडी न होण्यासाठी त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीवर टीका केली.

म्हणाले – काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अडवणुकीच्या धोरणामुळे, वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी झाली नाही. आम्ही तर फक्त ते हरलेल्या जागा मागितल्या होत्या. राज्य सरकारवर टीका करताना ते म्हणाले – हे सरकार काही गोष्टी स्वतःवर ओढवून घेते आहे. राज्य सरकार हे केंद्राचे निर्णय आणि आदेश मान्य करत नसेल तर ते बंद आहे. घटनाबाह्य आहे. त्यामुळे केंद्र कदाचित राष्ट्रपती राजवट लावू शकते.

ही बातमी पण वाचा : बेइमान सरकार पडले तर आम्ही पर्यायी सरकार देऊ, मनसेसोबत जाणार नाही : देवेंद्र फडणवीस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER