काँग्रेस आता देशाचे भवितव्य नाही – केजरीवाल

Arvind Kejriwal

दिल्ली :- “काँग्रेसची अधोगतीकडे वाटचाल सुरू आहे. असे वाटते की आता काँग्रेसला कोणी मायबाप शिल्लक नाही. ज्या प्रकारे ते कामगिरी करत आहेत त्यावरून काँग्रेस आता देशाचे भविष्य वाटत नाही, असे मत केजरीवाल यांनी व्यक्त केले.

नुकतेच बिहारमधील निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. नीतीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार बिहारमध्ये स्थापन झाले. महाआघाडीत काँग्रेसची कामगिरी निराशाजनक होती. काँग्रेसने ७० जागांवर निवडणुका लढवल्या आणि फक्त १९ जिंकल्या. या नव्या संदर्भात अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी काँग्रेसवर टीका केली.

ते ‘हिंदुस्तान टाइम्स लीडरशिप समिट २०२०’ यात बोलत होते. केजरीवाल म्हणाले – काँग्रेसची पूर्णपणे अधोगतीकडे वाटचाल सुरू आहे. काँग्रेसचा कोणी मायबाप आता शिल्लक नाही. राज्याराज्यांत  लोक भाजपाला कंटाळून काँग्रेसला मतदान करतात आणि नंतर काँग्रेसच भाजपाचे सरकार स्थापन करून देते ! काँग्रेसचे सर्व आमदार भाजपात सामील होतात. तुम्ही मत काँग्रेसला द्या किंवा भाजपाला, सरकार तर भाजपाचेच बनते!

काँग्रेसला भविष्य नाही

राष्ट्रीय स्तरावर कोणी तरी काँग्रेसचा पर्याय असायला हवा. स्थानिक पक्ष वर येऊ द्या किंवा अन्य काही. कारण आता काँग्रेसला काहीही भविष्य नाही. आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय राजकारणाविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट उत्तर दिले नाही. वेळच सांगेल की आमची भूमिका काय असेल, असे केजरीवाल म्हणाले.

आम आदमी पक्ष हा एक छोटा पक्ष आहे. परंतु दिल्लीत आम्ही केलेल्या विकासकामांमुळे देशातील लोक ‘आप’कडे आदराने पाहतात. मला खात्री आहे की, देशातील जनता पर्याय नक्की देईल, असे  म्हणालेत.

ही बातमी पण वाचा : ‘हे सत्य शिवसेनेच्या मुर्ख कार्यकर्त्यांना कधी समजणार’? काँग्रेस नेत्याची जहरी टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER