
मुंबई :- काँग्रेस (Congress) नेते आणि नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. सध्या विधानसभा अध्यक्षपद रिक्त आहे. या पदावर कोण येणार याची प्रतीक्षा आहे. मात्र हे पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता दिसत आहे. यावर काँग्रेस नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी काँग्रसची भूमिका स्पष्ट केली.
काँग्रेसकडे विधानसभेचे अध्यक्षपद आहे. या पदावर काँग्रेसचीच व्यक्ती नियुक्ती होईल, असा दावा बाळासाहेब थोरात यांनी केला. विधिमंडळाचे अधिवेशन १ मार्चपासून सुरू होत आहे. त्यापूर्वी ८ ते १० दिवस तिन्ही पक्षांतील पदाधिकारी एकत्र बसून आम्ही याबाबत निर्णय घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यापूर्वी थोरात यांच्याकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. मात्र पूर्णवेळ प्रदेशाध्यक्ष असावा म्हणून नाना पटोलेंची निवड करण्यात आली. यावर थोरात म्हणाले की, “प्रदेशाध्यक्षपदी अन्य व्यक्तीची निवड झाली म्हणून वाईट वाटण्याचे काहीच कारण नाही. मी काँग्रेसच्या अखिल भारतीय कार्य समितीचा सदस्य आहे. इतरही अनेक पदे माझ्याकडे आहेत.”
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला