
नवी दिल्ली :- माझ्या भाषणात अडथळे निर्माण करणे हे विरोधकांचे सुनियोजित षडयंत्र आहे. आपण पसरवलेल्या अफवांचा भांडाफोड होऊ नये यासाठी त्यांची ही धडपड सुरू आहे. काँग्रेस हा गोंधळलेला पक्ष असून त्यांनी कधीच देशाच्या भल्याचा विचार केला नाही, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर संबोधन करताना ते लोकसभेत बोलत होते.
दरम्यान मोदींचे भाषण सुरू असताना यावेळी काँग्रेसने सभात्याग केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभारप्रदर्शनावर उत्तर देत आहेत. त्यांच्या भाषणादरम्यान विरोधकांनी गदारोळ केला. या गदारोळानंतर मोदी संतापले व त्यांनी काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांचे कान टोचले. कृषी कायद्यांविषयी बोलताना मोदी म्हणाले, ‘या कोरोनाकाळात तीन कृषी कायदे लागू करण्यात आले. या कायद्यांच्या माध्यमातून होणा-या कृषी सुधारणा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कित्येक वर्षांपासून, आपल्या कृषी क्षेत्राला आव्हानांचा सामना करावा लागत होता. आम्ही त्यावर मात करण्याचा प्रयत्न केला आहे.
आम्हाला अद्याप भविष्यातील आव्हानांना सामोरे जावे लागेल. मी पाहात होतो की, येथे काँग्रेसच्या सहका-यांनी चर्चा केली की, ते कायद्याच्या रंगावर चर्चा करीत आहेत. काळा किंवा पांढरा आहे. त्याच्या आशयाची, त्याच्या हेतूविषयी चर्चा करणे चांगले झाले असते; जेणेकरून देशातील शेतक-यांपर्यंतही योग्य गोष्ट पोहचू शकेल.
ही बातमी पण वाचा : माझ्या भाषणात अडथळे आणणे हा पूर्वनियोजित कट, कारण…; मोदींचा आरोप
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला