काँग्रेसतर्फे गुरूवारी कोल्हापुरात ट्रॅक्टर रॅली प्रभारी एच. के.पाटील यांची उपस्थिती

H.K Patil

कोल्हापूर : केंद्रातील भाजप (BJP) सरकारने आणलेल्या काळ्या कृषी कायद्यांविरोधात कोल्हापूर (Kolhapur) जिल्हा काँग्रेसतर्फे (Congress) गुरूवारी (दि.५) ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीचे उद्घाटन राज्याचे काँंग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या हस्ते होणार आहे. निर्माण चौक येथून सकाळी साडेनऊ वाजता रॅलीची सुरूवात होवून दसरा चौक येथे सांगता होईल, अशी माहिती जिल्हा काँग्रेस अध्यक्ष तथा पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

ना. पाटील म्हणाले, कृषी सुधारणा विधेयकांविरोधात काँग्रेस पक्ष संघर्ष करत आहे. केंद्र सरकार उद्योगपतींच्या हिताचे आणि शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे. याविरोधात काँग्रेस अध्यक्षा सोनियागांधी यांच्या मार्गदर्शनाखाली खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने देशव्यापी लढाई सुरु केली आहे. यापार्श्वभूमीवर कोल्हापुरात ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार आहे. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री विश्वजीत कदम, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व आजी-माजी आमदार पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER