काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी कोरोना पॉझिटिव्ह; राज्यातील दिग्गज नेत्यांची घेतली होती बैठक

Congress

मुंबई : राज्यात कोरोनाने (Corona virus) थैमान घातले आहे. सर्वसामान्यासह लोकप्रतिनिधींनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. अशातच काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील (HK Patil) यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत आले आहेत. त्यामुळे याचा परिणाम काँग्रेस नेत्यांच्या आजच्या राज्यपाल भेटीवरही होण्याची शक्यता आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, गुरुवारी २४ सप्टेंबर रोजी एच. के. पाटील मुंबईत होते. काँग्रेसच्या टिळक भवन या प्रदेश कार्यालयात त्यांनी राज्यातील नेत्यांबरोबर बैठकही घेतली. या बैठकीला बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), अशोक चव्हाण (Ashok Chavan), विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar), अमित देशमुख (Amit Deshmukh), विश्वजित कदम (Viswajit Kadam) यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. त्यानंतर एच.के.पाटील यांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे कोरोनाची चाचणी करण्यात आली.

रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे पाटील यांच्या संपर्कात आलेल्या सर्व नेते आणि कार्यकर्त्यांना खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान कृषी कायद्याचा विरोध करत आज काँग्रेसचे शिष्टमंडळ प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांना भेटणार होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER