काँग्रेस आता ‘पीआर कंपनी’ झाली आहे – सुशील मोदी

rahul Gandhi & Sushil Modi.jpg

पाटणा :  बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय जनता दलच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इतर पक्षांची महाआघाडी झाली आहे. ही महाआघाडी राजदच्या नेतृत्वात लढणार आहे. तेजस्वी यादव हे तिचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. यावरून बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी (Sushil Modi) यांनी काँग्रेसला टोमणा मारला – … काँग्रेस, राहुल गांधी  (Rahul Gandhi) यांना पंतप्रधान व तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी काम करणारी पीआर कंपनी झाली आहे.

मोदी (PM Narendra Modi) यांचे पूर्ण ट्विट असे आहे – “काँग्रेस आता डॉ. राजेंद्र प्रसाद, सरदार पटेल आणि जगजीवन राम यांची पार्टी राहिलेली नाही. ती आता राहुल गांधी यांना पंतप्रधान व तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी काम करणारी पीआर कंपनी झाली आहे.

या पीआर कंपनीचा खर्च चिनी देणग्या, मनी लाँडरिंग ते तिकिटे विकण्याच्या कामातून चालतो आहे.” या ट्विटमध्ये मोदी यांनी राजीव फाउंडेशनला चीनकडून मिळालेली मदत आणि काँग्रेसमध्ये निवडणुकीचे तिकीट देण्यासाठी पैसे घेण्याच्या पद्धतीवर टोमणा मारला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER