काँग्रेसला सरकारमध्ये इज्जत नाही; आशिष शेलार यांचा टोमणा

Ashish Shelar

औरंगाबाद :- काँग्रेसला सरकारमध्ये इज्जत नाही. त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) भेटण्यासाठी पायपीट करावी लागते. काँग्रेसला आधी जनतेने झिडकारले, त्यानंतर आता महाविकास आघाडीनेही झिडकारले, असा टोमणा भाजपा (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मारला.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे भाजपा उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारानिमित्ताने शेलार आज (१९ नोव्हेंबर)  औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. औरंगाबाद येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते म्हणालेत, वीज बिलाचा मुद्दा आमचा आहे. आमच्या मुद्द्यावर मनसे आंदोलन करते आहे. महाविकास आघाडीने लबाडी केली. जनता त्यांना कधीच माफ करणार नाही. वीज बिलात आधी सवलत देऊ म्हणणाऱ्या नेत्यांना पक्षातील नेत्यांनीच किंमत दिली नाही. त्यामुळे त्यांना हे विधान करावे लागते. आम्ही चेतावणी देऊ, झोपडीत राहणाऱ्याला जास्त बिल कसे येते? याचे उत्तर त्यांना द्यावे लागेल. आम्ही मुद्दा सोडणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER