काँग्रेसला उतरती कळा; विरोधकांनी सात वर्षांत ६ राज्यांतील जागा गमावल्या

Congress

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल, आसाम आणि केरळ या तीन राज्यांमध्ये नुकतेच विधानसभा निवडणूक पार पडल्या. निवडणुकीत काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा पराभवाच्या वाटेवर होता. त्यामुळे काँग्रेसच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाल्याच्या चर्चेला पुन्हा एकदा गती मिळाली. गेल्या सात वर्षांमध्ये काँग्रेसने (Congress) जवळपास ६ राज्यांमध्ये विरोधी पक्षाची जागाही गमावली आहे.

नुकत्याच झालेल्या पुद्दुचेरी निवडणुकीत काँग्रेस पक्ष तिसर्‍या क्रमांकावर होता. तर बंगालमध्ये काँग्रेसला अवघी एक जागा मिळाली. पुद्दुचेरीत काँग्रेस पाच वर्षांपासून सत्तेत आहे. काँग्रेसला ३० पैकी अवघ्या दोन जागांवर विजय मिळवता आला.

काँग्रेसची घसरण

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला होता. त्यानंतर विविध राज्यात काँग्रेसची घसरण सुरू झाली. दक्षिणेकडील आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांत काँग्रेसची अवस्था बिकट आहे. तर त्रिपुरामध्ये २०१८ साली भाजपने डाव्यांचा गड उद्ध्वस्त केला. त्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने काँग्रेसकडून विरोधी पक्षनेतेपद हिसकावले. महाराष्ट्रातील २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस पक्ष चौथ्या क्रमांकावर होता. मात्र, या सरकारमध्ये काँग्रेसला पाहिजे तशी किंमत नाही. तर तामिळनाडूत काँग्रेस अद्याप द्रमुकचा लहान भाऊच आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये आता प्रादेशिक पक्ष काँग्रेसबरोबर युती करण्यास तयार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button