काँग्रेसचं सरकार व्यक्तीवर नाही मुल्यांवर टिकलेले; हे सरकार 5 वर्षे टिकेल – कॉंग्रेस

Randeep Surjewala
  • पायलट यांच्यावरील कारवाई नंतर मुख्यमंत्री गहलोत राज्यपालांच्या भेटीला
  • गहलोत सरकार आता जास्त काळ टिकणार नाही – भाजप

नवी दिल्ली : बंड करत राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट(Sachin Pilot) दिल्लीत गेले होते. मुक्यमंत्री अशोक गहलोत(Ashok Gehlot) आणि त्यांच्यातील तणाव प्रचंड वाढल्याने त्यांनी गहलोत मुख्यमंत्रीपदावर नकोच अशी मागणी कॉंग्रेस नेतृत्वाकडे केल्याचे वृत्त होते. त्यानंतर काही वेळातच कॉंग्रेसचे वरीष्ठ नेते सुरजेवाला यांनी पायलट यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्यात आल्याचे जाहीर केले.

सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि विश्वेंदर सिंह आणि रमेश मिना यांना मंत्रिपदावरुन तात्काळ काढलं जात असल्याची माहिती सुरजेवाला(Randeep Surjewala) यांनी पत्रकार परिषदेत दिली. व्हिप काढूनही सचिन पायलट आणि त्यांच्या गटातील आमदार गैरहजर राहिल्याने काँग्रेसकडून या सर्वांना नोटीस पाठवण्यात आली असल्याचे सुरजेवाला यांनी सांगितले. तसेच, काँग्रेसचं(Congress) सरकार व्यक्तीवर अवलंबून नाही, तर मुल्यांवर टिकलेलं असल्याचं सांगत हे सरकार 5 वर्षे टिकेल असे कॉंग्रेसचे प्रवक्ते सुरजेवाला यावेळी म्हणाले.

ही बातमी पण वाचा : गणेशोत्सवास परवानगी दिली तशी बकरी ईदलाही द्या ; कॉंग्रेसच्या नेत्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

सचिन पायलट यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. सुरजेवाला यांनी पायलट यांना त्यांचं म्हणणं पक्षाच्या मंचावर मांडण्यास सांगितलं. त्यांनी अगदी सोनिया गांधी(Sonia Gandhi) आणि राहुल गांधी(Rahul Gandhi) यांचाही हवाला देत सर्वजण त्यांचं म्हणणं समजून घेण्यास तयार असल्याचं सांगितलं. मात्र, यानंतरही सचिन पायलट तयार झाले नाही. अखेर पक्षाने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उभारला व सर्व पदांवरून पायलट यांना काढण्यात आले.

काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीत राजस्थानमधील नेतृत्व बदलण्यावर कोणतीही चर्चा होणार नाही. तसेच सर्व आमदार अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देतील, असे काँग्रेसकडून सांगण्यात आले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER